जैन समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आसाराम नाहटा यांचे निधन
By admin | Published: November 16, 2015 03:26 AM2015-11-16T03:26:01+5:302015-11-16T03:26:01+5:30
जैन समाजाचे सक्रिय कार्यकर्ता, ज्येष्ठ समाजसेवक व श्री अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, इतवारीचे माजी व्यवस्थापक ट्रस्टी आसाराम नाहटा याचे रविवारी निधन झाले
नागपूर : जैन समाजाचे सक्रिय कार्यकर्ता, ज्येष्ठ समाजसेवक व श्री अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, इतवारीचे माजी व्यवस्थापक ट्रस्टी आसाराम नाहटा याचे रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंत्ययात्रा सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे निवासस्थान गायत्री पॅलेस, सेंट्रल एव्हेन्यू इतवारी हायस्कूलजवळ येथून निघून गंगाबाई घाटावर जाईल.
आसारामजी साधारणत: १९५० मध्ये राजस्थान येथील गढसिवाना येथून नागपुरात आले होते. सुरुवातीपासूनच ते समाजकार्यात सक्रिय होते.
सामाजिक कार्यातील त्यांचा पुढाकार पाहता त्यांना चौधरी पदवी प्रदान करण्यात आली होती. जैन मंदिरात त्यांना भीष्म पितामह म्हणून संबोधले जायचे. देशभरातील जैन समाजात नागपूरची प्रतिमा तयार करण्यात त्यांचे विशेष योगदान होते. जैन समाजासोबतच त्यांचे संबंध माहेश्वरी, गुजराथी समाजासोबत होते.
काही दिवसांपूर्वीपर्यंत ते जैन साधू-संतांच्या दर्शनासाठी नियमित जात होते आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहत होते. ते भद्रावती तीर्थ मंडळाचे उपाध्यक्ष होते. (प्रतिनिधी)