‘जैतापूरच्या मुद्द्यावर सरकार फार काळ टिकणार नाही’

By admin | Published: May 20, 2015 01:25 AM2015-05-20T01:25:08+5:302015-05-20T01:25:08+5:30

जैतापूरच्या मुद्द्यावर सरकारमधील भाजपा-सेना पक्षांची भूमिका परस्परविरोधी असल्याने हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे व्यक्त केले़

'Jaitapur issue will not last long' | ‘जैतापूरच्या मुद्द्यावर सरकार फार काळ टिकणार नाही’

‘जैतापूरच्या मुद्द्यावर सरकार फार काळ टिकणार नाही’

Next

शिर्डी : जैतापूरच्या मुद्द्यावर सरकारमधील भाजपा-सेना पक्षांची भूमिका परस्परविरोधी असल्याने हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे व्यक्त केले़
कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना दुधाला प्रति लीटर पाच रुपये अनुदान देते, मग महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढणारे भाजपा-सेना सत्तेत एकत्र आहेत़ त्यांच्यात कोणताही समन्वय नाही, दोघेही स्वत:च्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत़ यात राज्यातील सामान्य जनता होरपळत आहे़, असे ते म्हणाले.
खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना सरकारने खरिपासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही़ मागील काँग्रेस सरकारने पावसाळ्यापूर्वी राज्यातील खरीप हंगामासाठी सुमारे चाळीस हजार कोटींचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले होते़ शेतकरी संघटनेचे नेते सरकारबरोबर असल्याने त्यांनी तरी सरकारवर दबाव आणून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Jaitapur issue will not last long'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.