जैतापूर प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करणार!

By admin | Published: April 30, 2015 01:53 AM2015-04-30T01:53:17+5:302015-04-30T01:53:17+5:30

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला.

Jaitapur project will destroy state! | जैतापूर प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करणार!

जैतापूर प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करणार!

Next

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला. आपला दावा स्पष्ट करण्यासाठी समितीने काही पुरावेही समोर ठेवले.
समितीने जैतापूर प्रकल्पाविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रपरिषद घेतली. त्यात समितीचे निमंत्रक, पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत म्हणाले, की माहिती अधिकाराखाली अणुऊर्जा खात्याने समितीला काही महत्त्वपूर्ण अहवाल दिले आहेत. त्यात १९७२ सालच्या मार्गदर्शक सूचना देणाऱ्या चक्रवर्ती समितीचा अहवाल आहे. या अहवालात भूभ्रंशापासून ५ किलोमीटरच्या क्षेत्रात अणुभट्टी बांधता येणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र २००२ सालच्या चतुर्वेदी समितीच्या स्थान निश्चिती संबंधी अहवालात याउलट परिस्थिती दिसते. चतुर्वेदी समितीच्या अहवालानुसार जेथे अणुभट्ट्या बांधल्या जाणार आहेत त्या माडबनच्या सड्यातूनच भूभ्रंश जात असल्याचे निदर्शनास येते. प्रकल्पाच्या स्थानापासून ५ किलोमीटर अंतराच्या आत आणखी दोन भूभ्रंश आहेत, असे ही कागदपत्रे सांगतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना या प्रकल्पविरोधी मत प्रदर्शित केल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी दिली. २०१३ साली झालेल्या चर्चेत खुद्द फडणवीस यांनी अमेरिकेतील सिनेट कमिटीच्या अध्यक्षांची भेट घेतल्याचे सांगितले होते. त्यात फडणवीस यांनी अध्यक्षांना अमेरिकेत १९७९ सालापासून अणुभट्टी बंद असल्याचे कारण विचारले होते. त्यावर पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या अणुऊर्जा प्रकल्प देशाला घातक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. त्यामुळे विरोधी पक्षात असताना प्रकल्पविरोधी वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शांत राहणे वेगळाच संदेश देते, असे ते म्हणाले.

डॉ. काकोडकरांचे वक्तव्य दिशाभूल करणारे ?
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपाचे धक्के बसणार नाहीत, हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही समितीने केला. गेल्या २० वर्षांमध्ये प्रकल्पस्थळाला मध्यम व मोठ्या स्वरूपाचे ९३ धक्के बसल्याचा दावा समिती करते. ही माहिती अणुऊर्जा महामंडळाकडून (एनपीसीआयएल) मिळाल्याचे समितीने सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रालाही प्रकल्पाचा धोका : अणुऊर्जा प्रकल्पाचा धोका केवळ कोकणवासीयांना बसेल हा गैरसमज आहे. कोणताही अपघात झाल्यास अणुऊर्जा प्रकल्पापासून १०० कि़मी़ त्रिजेत येणाऱ्या परिसराला त्याचा तीव्र फटका बसेल. त्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही झळ बसेल, असे समितीने सांगितले.

Web Title: Jaitapur project will destroy state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.