जयवीर सिंग ठरला किंग
By admin | Published: August 24, 2015 01:14 AM2015-08-24T01:14:27+5:302015-08-24T01:14:27+5:30
२६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या जयवीर सिंगने २१ किमीचे अंतर एक तास आठ मिनिटे आणि
ठाणे : २६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या जयवीर सिंगने २१ किमीचे अंतर एक तास आठ मिनिटे आणि १२.९ सेकंदांत, तर महिला गटात पुण्याच्याच अॅथलेटिक्स क्लबच्या मनीषा साळुंखे हिने ५८ मिनिटे १९.२ सेकंदांत १५ किमी अंतर कापून विजेतेपद पटकाविले. पुरु ष गटात अनिष थापा तर महिला गटात नीलम राजपूत उपविजेते ठरले. एकूण २४,३२३ स्पर्धक सहभागी झाले.
अभिनेता स्वप्नील जोशी आणि पालकमंत्र्यांनी सकाळी ६.४५ वाजता फ्लॅग आॅफ केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, अमेरिकेचे उपवाणिज्य दूत एलियस गेट डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, उपमहापौर राजेंद्र साप्ते, ठामपा स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
२१ किमी (पुरु ष गट)
प्रथम - जयवीर सिंग, आर्मी स्पोटर््स अॅकॅडमी, पुणे
द्वितीय - अनिष थापा, पुणे
तृतीय - कांतिलाल कुंभार, भोसला साई सेंटर, नाशिक
१५ किमी (महिला गट)
प्रथम - मनीषा साळुंखे, अॅथलेटिक्स क्लब, पुणे
द्वितीय - नीलम राजपूत, पश्चिम रेल्वे, तृतीय - विजयमाला पाटील, पश्चिम रेल्वे
१८ वर्षांखालील मुले : १० किमी
प्रथम - किसन तडवी, भोसला साई सेंटर, नाशिक, व्दितीय - सचिन गायकवाड, कोल्हावाडी परभणी, तृतीय - अक्षय आळंदे, राहुल आवाडे, इचलकरंजी
१५ वर्षांखालील मुले : ५ किमी
प्रथम - शिरीषकुमार पवार, एकात्मता स्पोर्ट्स क्लब, द्वितीय - दिनेश पठारे, संतोषीमाता सांस्कृतिक मंडळ, तृतीय - चिराग सावंत, संतोषीमाता सांस्कृतिक मंडळ.
१५ वर्षांखालील मुली : ५ किमी
प्रथम - नेहा फुफाणे, अनगाव
व्दितीय - अदिती पाटील, ठाणे
तृतीय - अश्विनी मोरे, राबाडे
१२ वर्षांखालील मुले : ३ किमी
प्रथम - कल्पेश गायकर, भिवंडी
व्दितीय - ब्रिजेश चौहान, कल्याण
तृतीय - लक्ष्मी अवधूत हिंगे, विटावा
१२ वर्षांखालील मुली : ३ किमी
प्रथम - साक्षी जाधव, भिवंडी, द्वितीय- निशा राय, वासिंद, तृतीय- संजना फुफाणे, अनगाव
(प्रतिनिधी)