राज्यात जलयुक्त शिवार अभियान

By Admin | Published: January 7, 2015 10:26 PM2015-01-07T22:26:40+5:302015-01-08T00:01:13+5:30

जलसंधारणांतर्गत उपाय : २३ जिल्ह्यात , राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत टंचाईसदृश स्थिती

Jalate Shikar campaign in the state | राज्यात जलयुक्त शिवार अभियान

राज्यात जलयुक्त शिवार अभियान

googlenewsNext

  रत्नागिरी : शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यभरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीसह अन्य २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्यासाठी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. सिंचनक्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय अस्तित्त्वात असलेल्या निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे / गाव तलाव / पाझर तलाव / सिमेंट बंधारे) इत्यादी पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे. जलस्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे. पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे, पाणी अडविणे-जिरवणेबाबत लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी समन्वय समितीची जिल्ह्यावरच नव्हे; तर तालुकास्तरीय समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. १५ ते जानेवारी १९ जानेवारीअखेर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी मनरेगा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा नियोजन समिती निधी, जिल्हा परिषद सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. विभागीय तसेच राज्यस्तरीय पारितोषिकांसाठीही तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. गावातील लोकांना अभियानाची माहिती देण्यासाठी, गावाचा आराखडा अंतिम करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कृषिसेवकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेता येईल. (प्रतिनिधी) गावपातळीवर प्रयत्न जलशिवार योजनेंतर्गत गावपातळीवर पाण्यासाठी प्रयत्न . पाण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रभावी प्रयत्नांना अधिक बळकटी देणार. जिल्ह्यातून नव्हे; तर तालुक्यातून जलसंवर्धनसाठी समित्या गठीत करण्याचा प्रयत्न. लोकसहभागातून पाणी साठवणीवर भर देणार. जलप्रबोधनाच्या सर्वंकष प्रयत्नाना सर्व स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन. चार वर्षांसाठी अभियान राबविण्यासाठीची जलनीती तयार. संस्थांचा सहभाग व सरकारचे प्रयत्न या दोहोंचा समन्वय ठरणार महत्त्वाचा. ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार.

Web Title: Jalate Shikar campaign in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.