सोने आणि पाईपपाठोपाठ चटई उद्योगात जळगावचा दबदबा

By admin | Published: October 6, 2016 04:17 PM2016-10-06T16:17:50+5:302016-10-06T16:17:50+5:30

प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकावू चटई बनविण्याची सुरुवात जळगावात ३० वर्षांपूर्वी झाली.

Jalgaon dominance in the plastic industry after gold and pipe | सोने आणि पाईपपाठोपाठ चटई उद्योगात जळगावचा दबदबा

सोने आणि पाईपपाठोपाठ चटई उद्योगात जळगावचा दबदबा

Next

राम जाधव, ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ६  - प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकावू चटई बनविण्याची सुरुवात जळगावात ३० वर्षांपूर्वी झाली. पर्यावरणपूरक असलेल्या या उद्योगाला जळगावची भूमी मानवली आणि तब्बल १२५ उद्योग येथे सुरू झाले. देशातील एकूण चटई उद्योगांपैकी ८० टक्के उद्योग जळगावात असून त्यातील बराच माल हा परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे सोने, पीव्हीसी पाइपपाठोपाठ चटई क्षेत्रातही जळगावचा दबदबा निर्माण झाला आहे.
आशियातील सगळ्यात मोठा चटई व्यवसाय जळगावात आहे़ मात्र आता कोलकाता, बंगळुरू व चेन्नई या शहरातही हा उद्योग सुरू झाल्याने येथील खरेदीदार येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी बहुतेक फेरीवाले खरिपाच्या हंगामातून मिळालेला पैसा चटई खरेदी करण्यासाठी गुंतवत असतात.

पावसाने आशा पल्लवीत
या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे काही महिन्यांपासून पडून असलेल्या तयार मालाला दिवाळीपर्यंत चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


यंत्रमागप्रमाणे हव्यात सवलती
४१०० टक्के निरुपयोगी व फेकलेल्या प्लॅस्टिकपासून ही चटई तयार केली जाते़ पर्यावरणपूरक असलेल्या या उद्योगासाठी इतर राज्यांमध्ये ५ ते ६ रुपये युनिटचे वीजदर आहेत तर त्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर ८ ते ९ रुपये आहेत़ यंत्रमाग उद्योगाप्रमाणे या उद्योगालाही सवलतीच्या कक्षेत आणावे, अशी अपेक्षा आहे.


१५ हजार जणांना रोजगार
जळगावात १२५ पेक्षा जास्त चटई उद्योग आहेत़ यावर प्रत्यक्ष अवलंबून असलेले १५ ते १६ हजार कामगार; या उद्योगाला कच्च्या मालासह इतर वर्कशॉप व वाहतूक व्यवस्था पुरवणारे अशा हजारोंना या क्षेत्रात रोजगार मिळतो़ सध्या या व्यवसायात सातत्य नसल्याने रोजगार सोडणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे़ तसेच सतत ३० ते ४० टक्क्यांनी कुशल आणि अर्धकुशल कामगारांची उणीव जाणवते़

हा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. प्रत्यक्ष शेती क्षेत्रातील फेरीवाल्यांवर अवलंबून असलेल्या या व्यवसायात अनेक अकुशल कामगारांनाही रोजगार मिळतो आहे़ शासनाकडून या पर्यावरणपूरक व्यवसायावर विविध कर आकारून अन्याय होत आहे़
- दिनेश राठी, अध्यक्ष, मॅट असोसिएशन, जळगाव़

Web Title: Jalgaon dominance in the plastic industry after gold and pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.