उडान योजना जमिनीवर; कोल्हापूर, नाशिकसह जळगावची विमानसेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:21 AM2018-10-17T06:21:48+5:302018-10-17T06:22:24+5:30
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी उडान योजना महाराष्ट्रात जमिनीवर आल्याची स्थिती आहे.
जळगाव/ href='http://www.lokmat.com/topics/kolhapur/'>कोल्हापूर/ href='http://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी उडान योजना महाराष्ट्रात जमिनीवर आल्याची स्थिती आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा १५ दिवसांपासून बंद आहे. कोल्हापूर-मुंबई आणि नाशिकची मुंबई आणि पुणे सेवाही ठप्प झाली आहे.
जळगावची सेवा प्रारंभापासूनच विस्कळीत आहे. मुंबई विमानतळावर धावपट्टी उपलब्ध होत नसल्याचे कारण एअर डेक्कनकडून देण्यात येते. १५ दिवसांपासून सेवा बंद झाली असल्याचा दुजोरा एअर डेक्कनचे अधिकारी राहुल राकेश यांनी दिला. विमानास उशीर होण्याचेही वाढते प्रमाण आहे.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा वीस दिवसांपासून बंद आहे. एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
नाशिक-दिल्लीची सेवा वगळता मुंबई आणि पुणे सेवा ठप्प झाली आहे. रडतखडत सुरू असलेली ही सेवा आठ दिवसांपासून बंद पडली आहे, तर नाशिक-अहमदाबाद ही ट्रु जेटची २८ आॅक्टोबरपासून सुरू होणारी सेवा रद्द झाली आहे. ती २ डिसेंबरला सुरू होईल.