जळगावचे गुरुमुख जगवाणी विधान परिषदेवर बिनविरोध

By admin | Published: June 28, 2014 01:02 AM2014-06-28T01:02:15+5:302014-06-28T01:02:15+5:30

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. गुरुमुख जगवाणी बिनविरोध निवडून आले आहेत.

Jalgaon's Gurukul Jaganni unanimously elected on the Legislative Council | जळगावचे गुरुमुख जगवाणी विधान परिषदेवर बिनविरोध

जळगावचे गुरुमुख जगवाणी विधान परिषदेवर बिनविरोध

Next
>जळगाव : विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. गुरुमुख जगवाणी  बिनविरोध निवडून आले आहेत.  
शुक्रवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर डॉ.जगवाणींच्या विरोधातील सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार मनीष जैन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त  झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. त्यासाठी एकूण 17 अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे करण पाटील व ज्ञानेश्वर महाजन आणि इतर दोघांचे असे चार अर्ज अवैध ठरले. इतर 12 उमेदवारांनी शुक्रवारी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. खान्देश विकास आघाडीचे कैलास सोनवणो व विष्णू भंगाळे तर शिवसेनेचे कैलास पाटील, प्रल्हाद महाजन व काँग्रेसचे हरीश गनवाणी व शुभांगी पाटील यांच्यासह अपक्षांनीही माघार घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Jalgaon's Gurukul Jaganni unanimously elected on the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.