जालना बाजार समिती : शासनाच्या आडतपट्टी वसुलीच्या निर्णयाला विरोध
By admin | Published: July 8, 2016 07:03 PM2016-07-08T19:03:14+5:302016-07-08T19:03:14+5:30
बाजार समितीत आडत पट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला
व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद
जालना बाजार समिती : शासनाच्या आडतपट्टी वसुलीच्या निर्णयाला विरोध
जालना : बाजार समितीत आडत पट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते.
जालना बाजार समितीतीत माल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भुसार माल गुळ अडीच टक्के व भाजीपाला सहा टक्के प्रमाणे आडत वसुली करण्यात येत होती. राज्य शासनाने ५ जुलै रोजी अध्यादेश जारी करून आडत दराची रक्कम ही खरेदीदारांकडून आडतींयानी वसूल करावी, असे आदेश दिजे आहेत. तसेच पणन संचालकांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. त्याची अमलंबजावणी बाजार समितीने सुरू केल्यानंतर याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करील बाजार समितीला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या अध्यादेशाविरोधात शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला आहेत. (प्रतिनिधी)
........................................
८०० क्विंटल आवक
जालना बाजार समिती गुरूवारी ईदनिमित्त बंद होती. त्यामुळे शुक्रवारी बाजार समिती गहू, ज्वारी, हरभरा व सोयाबिनची ८०० क्विंटल आवक झाली होती. बाजार समितीकडून दररोजप्रमाणे लिलाव सुरू करण्यात आले. मात्र, लिलावाच्या बोलित एकाही व्यापाऱ्याने सहभाग नोंदविला नसल्याचे बाजार समितीचे अधिकारी मोहन राठोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
..........................................
बाजार समितीकडून आवाहन
व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंद पाळून बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी पुढील सुचना व आदेश येईपर्यंत बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
...............................