जालन्यात भाजपा बहुमतापासून दूर

By admin | Published: February 24, 2017 04:49 AM2017-02-24T04:49:23+5:302017-02-24T04:49:23+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला २२ जागांवर यश मिळाले आहे. त्याखालोखाल शिवसेना

In Jalna, BJP is far from a majority | जालन्यात भाजपा बहुमतापासून दूर

जालन्यात भाजपा बहुमतापासून दूर

Next

जालना : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला २२ जागांवर यश मिळाले आहे. त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी मतमोजणी झाली. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निकालानंतर भाजपाला २२ जागा मिळाल्या असल्या तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी ६ सदस्यांची गरज राहणार आहे. तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे.
दोनपैकी एक अपक्ष उमेदवार हा शिवसेनेचा बंडखोर आहे. तर अन्य एका उमेदवाराने यापूर्वीही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे दोन्ही अपक्ष भाजपाच्या गळाला लागणे तसे कठीणच आहे. जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत सर्व पर्याय खुले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील त्याची अमलबजावणी केली जाईल, असे शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने युती किंवा आघाडी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

जालना

पक्षजागा
भाजपा२२
शिवसेना१४
काँग्रेस०५
राष्ट्रवादी१३
इतर0२

Web Title: In Jalna, BJP is far from a majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.