जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

By निलेश जोशी | Published: September 3, 2023 04:38 PM2023-09-03T16:38:20+5:302023-09-03T16:38:55+5:30

Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

Jalna lathimar case: 'Inquiry through Additional DG, will not spare anyone', CM Eknath Shinde announces | जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

googlenewsNext

- नीलेश जोशी
बुलढाणा - जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

बुलढाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने ते ३ सप्टेंबर रोजी आले असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सोबतच गरज पडल्यास या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचीही भूमिका त्यांनी अधोरेखीत केली आहे. मराठा समाजाला भक्क व टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. त्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. नेमके आम्ही काय करणार आहोत हे सगळच येथे सांगत नाही. कारण काड्या करणारे पुन्हा काड्या करतील, अशी टिकाही त्यांनी विराेधकांवर केली. लवकच मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळेल. न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटना दुर्देवी आहे. ती व्हायला नको होती. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसापूर्वी आपण बोललो होता. प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे आपण सांगितले होते. त्यांच्या मुद्द्यावरही राज्य शासन काम करत आहे. आपल्या जरंगे पाटील यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. पण दुर्देवाने ही घटना घडली.

या दुर्देवी घटनेस जबाबदार असलेेले तेथील पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. सोबतच दुसरे ॲडीशनल एसपी व डीवायएसपींना जिल्ह्याबारे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात येत आहे.

ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना हे या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांना त्वरित निलंबीत करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल, याबाबत आपण आपणास आश्वस्त करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान या मुद्द्यावर काहीजण आपली राजकीय पोळी भाजू इच्छित आहे. त्यांना बळी पडून नका. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सामान्य माणसला अंतर दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Jalna lathimar case: 'Inquiry through Additional DG, will not spare anyone', CM Eknath Shinde announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.