नदीजोड प्रकल्पाचे ‘जलपूजन’

By admin | Published: January 12, 2016 01:56 AM2016-01-12T01:56:09+5:302016-01-12T01:56:09+5:30

शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत पूर्णा-पेढी नदीजोड प्रकल्पाचे जलपूजन राज्याच्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. हा सोहळा

'Jalpujan' of river Jod | नदीजोड प्रकल्पाचे ‘जलपूजन’

नदीजोड प्रकल्पाचे ‘जलपूजन’

Next

चांदूरबाजार (जि. अमरावती) : शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत पूर्णा-पेढी नदीजोड प्रकल्पाचे जलपूजन राज्याच्या जलसंधारण मंत्री
पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. हा सोहळा
नजरपूर शिवारात पार पडला.
या वेळी पालकमंत्री प्रवीण
पोटे, जिल्हाधिकारी किरण
गित्ते, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे पूर्णा मध्यम प्रकल्पातील धरणाचे पाणी पेढी नदीत जाणार आहे. पूर्णा प्रकल्पातील सिंचनाच्या पाण्याला कोणताही धक्का न लावता पूर्णा प्रकल्पाच्या डाव्या बाजूच्या श्यामपूर लघु पाटामधून वापरल्या न जाणाऱ्या ‘वेस्टेज वॉटर’चा उपयोग या
नदीजोड प्रकल्पासाठी केला जाणार आहे.
हे वाया जाणारे पाणी राज्यात अडविण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आठ महिने शाश्वत पाणी मिळणार आहे.
धरण- कालवा- टेल ते नजरपूर
नाला, तेथून शर्यतपूर नाला ते
पेढी नदी अशा प्रकारे पेढी नदीला बाराही महिने प्रवाहित ठेवणारा हा
२५ किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ४०० हेक्टर
शेती सिंचनाखाली येणार
आहे.

Web Title: 'Jalpujan' of river Jod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.