दहा लाख बोगस खात्यांमागे ‘जन-धन’चा अट्टाहास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 03:37 AM2017-09-14T03:37:06+5:302017-09-14T03:38:00+5:30

राज्यात दहा लाख शेतकºयांची बँक खाती बोगस असल्याचे जे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्याच्या मुळाशी ‘जन-धन’योजनेत खाती उघडण्याची राष्ट्रीयकृत बँकांना केलेली सक्ती कारणीभूत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 Jan-Dhan's dream of one million bogus accounts! | दहा लाख बोगस खात्यांमागे ‘जन-धन’चा अट्टाहास!

दहा लाख बोगस खात्यांमागे ‘जन-धन’चा अट्टाहास!

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : राज्यात दहा लाख शेतकºयांची बँक खाती बोगस असल्याचे जे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्याच्या मुळाशी ‘जन-धन’योजनेत खाती उघडण्याची राष्ट्रीयकृत बँकांना केलेली सक्ती कारणीभूत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बँकांशी कनेक्ट नसलेल्या शेतकºयांना जोडणारी योजना म्हणून ‘जन-धन’ चे कौतुक केले जाते. या योजनेचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत साध्य करण्याचा दबाव असल्याने राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खातेदार बनविले. त्यातील हजारो शेतकरी हे आधीच सहकारी बँकांचे खातेदार होते. त्यामुळे आता कर्जमाफीचा विचार करताना अनेक नावांची पुनरावृत्ती होत आहे.
‘जन-धन’मध्ये जी खाती काढण्यात आली तीत प्रत्यक्ष कुठलाही आर्थिक व्यवहार होत नाही. मध्यंतरी नोटाबंदीच्या काळात काही बँकांमध्ये ‘जन-धन’मधील खात्यांत पैसा जमा झाला. तो काळा पैसा होता का याची चौकशी झाली तर धक्कादायक माहिती समोर येईल, असा दावा बँकेच्या एका ज्येष्ठ अधिकाºयाने लोकमतशी बोलताना केला. १० लाख बोगस बँक खाती नेमकी कोणत्या बँकांमधील आहेत व त्यात रक्कम आहे की नाही, हे पाटील यांनी स्पष्ट केले नाही. तथापि, शेतकºयांची बोगस खाती असल्याचे विधान केल्याने त्यांनी विरोधकांची टीका मात्र ओढावून घेतली आहे.

Web Title:  Jan-Dhan's dream of one million bogus accounts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.