पुणे पदवीधर मतदारसंघातून जनता दल सेक्युलरतर्फे प्रा. शरद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:07 PM2020-11-10T14:07:32+5:302020-11-10T14:10:13+5:30
politics, jantadalsceular, pune, kolhapur, sangli, satara, solapur, padwidhar, elecation, saradpatil जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे वतीने विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई - जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे वतीने विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पक्षाचे वतीने राष्ट्रीय महासचिव बी.जी. कोळसे पाटील, राज्य प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, कार्याध्यक्ष रेवण भोसले, उपाध्यक्ष डॉ. पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रा. शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदारसंघांतून दोन वेळा निवडून आले होते. तसेच विधानपरिषदेवर इ. स. २००२ मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघांतून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी होणा-या पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये प्रा. शरद पाटील यांना पदवीधर मतदारांनी क्रमांक १ चे मत देऊन पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.
या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनीही प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन या नेत्यांनी जनता दलाच्या वतीने केले आहे.
प्रा. शरद पाटील यांना विधानसभेचा १० वर्षे व विधानपरिषदेचा ६ वर्षे याप्रमाणे दीर्घ अनुभव आहे. विधानपरिषद सदस्य व जनता दल प्रदेश अध्यक्ष या नात्याने पुणे पदवीधर मतदारसंघात ते सुपरिचित आहेत. प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस अनेक पुरोगामी व लोकशाही पक्ष व संघटनांकडून पाठींबा मिळत आहे अशीही माहिती देण्यात आली आहे.