मुख्यमंत्र्यांना जपानी विद्यापीठाची डॉक्टरेट
By admin | Published: October 6, 2015 02:58 AM2015-10-06T02:58:38+5:302015-10-06T02:58:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात येणार असून, अशी डॉक्टरेट मिळविणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात येणार असून, अशी डॉक्टरेट मिळविणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
ओसाका सिटी विद्यापीठातर्फे दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून, गेल्या २० वर्षांत आतापर्यंत १० लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात परिवर्तन घडवू पाहात आहेत. अडथळ्यांवर मात करून ते करीत असलेल्या प्रयत्नांची विद्यापीठाने प्रशंसा केली आहे. या पदवीसाठी संबंधित मानकऱ्यांचा ओसाका सिटी विद्यापीठ अथवा ओसाका शहराशी वैशिष्ट्यपूर्ण संबंध अपेक्षित असतो. पश्चिम जपानमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा कन्साई प्रांतातील प्रमुख शहर ओसाकाची मुंबई शहराशी औद्योगिक क्षेत्रात भागीदारी आहे. फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात ओसाकाला भेट दिली होती. (विशेष प्रतिनिधी)