जाट, पटेलांचा मेनू फॉर्म्युला राबवू -नितेश राणे

By admin | Published: May 27, 2016 09:56 PM2016-05-27T21:56:31+5:302016-05-27T21:56:31+5:30

आरक्षणाच्या मुद्यावर जाट आणि पटेलांचे आंदोलन पाहिले़ देशपातळीवर त्यांच्या उग्र आंदोलनाची दखल घेतली गेली़.

Jat, Patel's menu should be implemented in the formula - Nitesh Rane | जाट, पटेलांचा मेनू फॉर्म्युला राबवू -नितेश राणे

जाट, पटेलांचा मेनू फॉर्म्युला राबवू -नितेश राणे

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 27 - आरक्षणाच्या मुद्यावर जाट आणि पटेलांचे आंदोलन पाहिले़ देशपातळीवर त्यांच्या उग्र आंदोलनाची दखल घेतली गेली़. तोच मेनू फॉर्म्युला आपण राबवू़ आम्ही निवेदने का देत बसावेत ? असे स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, कणकवलीचे आमदार नितेश राणे म्हणाले. 
मराठा आरक्षण मेळाव्यानंतर शासकीय विश्रामगृहावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना जाट, पटेल मेनू फार्म्युला स्पष्ट केला. याच प्रश्नावर कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीची आठवण करुन देत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षांतील पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचे सांगितले़ नाशिकमधील मेळाव्यातही अशाप्रकारे सर्वच पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत आल्याचे सांगितले़ कोणत्या झेंड्याचा रंग घेऊन मैदानात उतरलो नसल्याचेही सांगून राज्यभरात अजून १५ मेळावे होतील आणि त्याक्षणी मराठा समाज पेटलेला दिसेल म्हणाले. 
सोलापुरातील महानगरपालिका निवडणुकीच्या मुद्यावर बोलताना लोकांच्या मागणीचा विचार करुन संघटनेच्या पदाधिकाऱ्याला काँग्रेस तिकीट देईल म्हणाले़ शिवसेनेविषयी छेडले असता ह्यशिवसेनेचा वाघ गल्लीगल्लीतून संपल्याचीह्ण टीका केली़ ग्रामीण भागात काँग्रेसबद्दल चांगले मत आहे़ मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत़ बेकारी वाढत आहे़ दिवस कसला साजरा करताय? अशी बोचरी टीकाही राणे यांनी केली़. 
संघटन मजबुतीवर बोलताना सुभाष पाटीलसारखा प्रामाणिक कार्यकर्ता काळाआड गेल्याचे दु:ख व्यक्त करत तसेच कार्यकर्ते पुढील काळात मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले़ मंत्रालयातील सचिवाचे लाचप्रकरण आणि एकनाथ खडसे प्रकरणावर भाष्य करताना सरकारचे कोणावरही अंकुश नसल्याचे म्हणाले़ गृहविभागही सक्षम नसल्याचे सांगून काँग्रेसला सडेतोड, आक्रमक अशा नारायण राणेंसारख्या व्यक्तीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Jat, Patel's menu should be implemented in the formula - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.