जत्रा, यात्रांमुळे तमाशाला नवसंजीवनी
By Admin | Published: April 30, 2017 01:36 AM2017-04-30T01:36:30+5:302017-04-30T01:36:30+5:30
महाराष्ट्राची मुख्य लोककला व लावणीचा बाज, ढोलकीचा ताल आणि विनोदाची मैफील असलेल्या तमाशा मंडळांना यंदा ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने यात्रा, जत्रा उत्सवातील
- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)
महाराष्ट्राची मुख्य लोककला व लावणीचा बाज, ढोलकीचा ताल आणि विनोदाची मैफील असलेल्या तमाशा मंडळांना यंदा ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने यात्रा, जत्रा उत्सवातील सुपाऱ्या मिळाल्याने नवसंजीवनी मिळाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक गावांचे यात्रौत्सव फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत असतात. तालुक्यात यंदा तमाशा मंडळांचा सुमारे ७० लाखांचा गल्ला भरला आहे. पूर्वी आठ महिने राहुट्यात चालणारी २० मोठी तमाशा मंडळे तर जत्रेपुरत्या सुमारे १०० पार्ट्या होत्या. काळाच्या ओघात अनेक फड संपले.
साडेतीन लाखांची विक्रमी सुपारी
आता यात्रा, जत्रा उत्सवाच्या काळापुरते ५० फड उभे राहतात. तमाशा मंडळाचे नाव, दर्जा, कलाकार पाहून ५० हजार ते ३ लाख ५० हजारापर्यंत दोन खेळाची सुपारी मिळते. रघुवीर खेडकर तमाशा मंडळास चैत्र पौर्णिमेची ३ लाख ६५ हजार एवढी विक्रमी सुपारी मिळाली.