जावेद अख्तर यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 04:29 PM2018-04-30T16:29:28+5:302018-04-30T16:29:28+5:30

ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Javed Akhtar meet MNS President Raj Thackeray | जावेद अख्तर यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट

जावेद अख्तर यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट

googlenewsNext

मुंबई - ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे उपस्थित होते. 
या भेटीवेळी जावेद अख्तर आणि राज ठाकरे यांच्यात सध्याची सामाजिक स्थिती, राजकीय परिस्थिती तसेच साहित्य, कला अशा विविध विषयांवर चर्चा झाली. 

राज ठाकरेंच्या वसईतील सभेसाठी मनसेची मोर्चेबांधणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा मंगळवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी वसईतील चिमाजी आप्पा मैदानावर होणार असून या सभेसाठी मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यांच्या महराष्ट्र दौऱ्याची ही सुरुवात असल्याने ते कुणावर निशाणा साधणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ठाकरे यांनी वसई तालुक्यातील राजावली, वाघ्रालपाडा येथील जमिनीवरील अवैध बांधकामांची पोल खोल केल्यानंतर वसईतील मनसे कार्यकर्त्यांनी ही बांधकाम तोडण्यात यावीत या साठी तहसील कार्यालयावर आंदोलन केले याते या १२ कार्यकर्त्यांवर गुन्हे ही नोदवण्यात आले होते. हे प्रकरण मनसे ने उचलून धरल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महसूल विभाग, वनविभाग, पालघर पोलीस, वसई विरार शहर महापालिका यांनी संयुक्तपणे कारवाई करत वन जमीनीवरील अवैध बांधकामे पाडण्यात आली होती. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना वेठीस धरणा-या महसूल विभाग, वनविभाग, पालघर पोलीसांवर राज ठाकरे हे समाचार घेणार का की, वसईतील सत्ताधाºयांवर नेम धरणार या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Javed Akhtar meet MNS President Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.