जव्हारला झोडपले, जिल्ह्यात रिपरिप सुरुच
By admin | Published: July 15, 2017 02:58 AM2017-07-15T02:58:30+5:302017-07-15T02:58:30+5:30
शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टॅण्डच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार असून शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टॅण्डच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिमखाना हॉल समोरील, जव्हारकर मिल समोरील रस्त्यावर एक ते दिड फूट पाणी भरून तेथील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
शहरातील जिमखाना हॉल समोरील बिल्डींग मटेरीयल स्पलायचे दोन दुकाने व त्यांच्या बाजुला टायर व इनव्हर्टरचे दुकान असून बिल्डींग मटेरीयल मधील जुम्मानी व भुवर यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे सिमेंटच्या गोणी भिजून मोठे नुकसान झाले. तर टायर व इनव्हर्टरच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आकर प्लाझा व परिसरातील दुकानांतही मोठ्याप्रमाणात कपड्यांच्या व जनरल स्टोर्सच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने सामानांचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील अनियोजीत गटारांचे बांधकाम व त्यांची पावसापुर्वी साफसफाई न झाल्याने तुंबलेल्या गटारीमुळेच रस्त्यांवर पाणी साचून नुकसान झाल्यामुळे नगर परिषदेने झालेल्या नुकसानाची भरपाई करावी अशी मागणी इमरान जुम्मानी यांनी केली आहे. पावसामुळे काहीकाळ वाहतूकीवर परिणाम झाला होता.
>पावसामुळे शेतीच्या कामांना सुरुवात
विकमगड: तालुक्यात गेल्या आठवडयापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या भागातील शेतकऱ्याची भात लावण्याची कामे खोळबली होती. तालुक्यात ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. भात हे मुख्य पिक असून या वरच या भागातील आर्थिक उत्पन्न अवलूबन आहे. या अगोदर काही शेतकऱ्याची भात लावणी झाली होती ती पिके सुकू लागली होती काही शेतकऱ्यानी तरे विहिरपंप लाऊन भात लावणी सूरू केली परतू बुधवार पासून पुन्हा पावसाला चांगली सुरवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून पुन्हा शेतीची कामे सुरू झाली आहेत.गेले काही दिवस पावसाने तालुक्याातील शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्यामुळे ते चांगलेच धास्तावले होते. मात्र आता पुन्हा तालुक्यात सर्वत्र शेतीच्या कामांना सुरवात झाली आहे. सलग पाऊस. झाल्यास यंदा भाताचे पीक चांगले येईल, असा अंदाज शेतकरी रणधिर पाटील यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.
>मोखाड्यात सर्वाधिक नोंद
पालघर: गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार सुरु वात केली असून यामुळे बळीराजाची चिंता दूर होणार असे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक पावसाची नोंद मोखाडा तालुक्यात १००.५ मिमी इतकी नोंद झाली आहे. त्याखालोखाल जव्हार ९४.० मिमी तर विक्र मगड तालुक्यात ६९.० मिमी, वाडा तालुक्यात ६८.३ मिमी, तलासरी ४३.१ मिमी,डहाणू तालुक्यात ३५.० मिमी, पालघर तालुक्यात १२.८ तर सर्वात कमी पाऊस वसई तालुक्यात झाला असून आजची तालुक्यातील पावसाची नोंद ४.२ अशी आहे.जिल्ह्यातील धरणांचा आजचा पाणीसाठा समाधान कारक असून धामणी धारण-प्रकल्पीय संकिल्पत क्षमता २७६.३५ दलघमी असून आजचा पाणीसाठा १९७.३७ दलघमी, कवडास-प्रकल्पीय संकिल्पत क्षमता ९.९६ दलघमी तर, आजचा पाणीसाठा ९.९६ दलघमी तर वांद्री -प्रकल्पीय संकिल्पत पाणीसाठा ३५.९४ दलघमी असून आजचा पाणीसाठा १६.२७ दलघमी आहे.
>वसईत आभाळमायेला फुटला पाझर
पारोळ : वसई भात लावणीच्या ऐन हंगामात आभाळमाया पातळ झाल्याने अनेक दिवसा पासून या परिसरात उन्ह सावली चा खेळ सुरु होता. तसेच भात लावणी हवा तसा पाऊस पडत असल्याने या भागात लावणीची कामे खोळंबली होती. पाऊस पडत नसल्याने लावणीचा हंगाम निघून जातो की काय अशी चिंता बळीराजाला लागली असतानाच आभाळ मायेने आपला पान्हा सोडल्यांने पुन्हा एकदा वसई भात लावणी च्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार असल्याने तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या वर्षी पावसाची सरासरी जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला तर पंचाग कर्त्यांनी नक्षत्र व त्यांचे वाहन या वर पावसाचा अंदाज बांधला. पण त्या अंदाजाला पावसाने खोटे ठरवले. दरम्यान, बळीराजाने मात्र अंदाजाच्या भरोशावर महागडी भात बियाणी पेरली आहेत. यावर्षी वेळोवेळी पावसाने दडी मारल्याने आधी पेरण्या नंतर आता भर भात लावणी च्या हंगामातही पाऊस सुट्टीवर गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. पण पुनर्वसूच्या कोल्हाने लबाडी न करता चांगल्या पावसाच दान दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.