जव्हार रुग्णालय होणार लवकरच २०० खाटांचे
By admin | Published: October 3, 2016 03:25 AM2016-10-03T03:25:07+5:302016-10-03T03:25:07+5:30
येथील कुटीर रूग्णालय लवकच २०० खाटांचे केले जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलतांना दिली
हुसेन मेमन,
जव्हार- येथील कुटीर रूग्णालय लवकच २०० खाटांचे केले जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलतांना दिली. रविवारी दुपारी त्यांनी अचानक भेट देऊन, कुपोषीत बालकांची पाहणी करून विचारपूस केली.
जव्हार, मोखाडा व विक्र मगड व वाडा तालुक्यात कुपोषणाने बळी पडत असलेल्या बालकांच्या पालकांना व संबंधित डॉक्टरांना विचारणा करून सॅम व मॅम ची एस. एन. सी. यू. वॉर्डातील बालकांची पाहणी केली.
याबाबत मंत्री सावंत म्हणाले की, कुपोषित बालकांची सद्य स्थिती काय आहे? त्यांच्या वजनात वाढ होते की नाही? याची माहिती घेण्याकरीता जव्हार व मोखाडा दौरा करीत आहे. तसेच सॅम व मॅम मुलांचे
मॉनिटरींग करणे खूपच गरजेचे
असून त्यावर उपाय योजना केली जाईल व नविन प्रोटोकल तयार करून सॅम आणि क्रिटीकल सॅम अशी विभागणी करण्यात येणार असून यामुळे बालक इन्फेकशने आजारी असल्यावर त्यावर तसा उपाय व इतर प्रकारामुळे आजरी असल्यास त्यावर तसा उपाय करण्यावर भर दिला जाईल, असे सांवत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
या रूग्णालयात ६०० ग्रॅम वजनाची बालके असून त्याच्यावरील उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रणांचीही व्यवस्था लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. २०० खाटांची मंजूरी सन २०१२ ला मिळालेली असूनही अद्याप २०० खाट का बसविल्या गेल्या नाहीत.
>स्त्री, बालरुग्णांसाठी होणार स्वतंत्र विभाग
जव्हारला विक्र मगड, मोखाडा येथून रूग्ण येतात त्यामुळे रूग्णांचे प्रमाण जास्त असते. परीणामी एका खाटेवर २ रूग्ण अशी अवस्था सध्या दिसत आहे, यावर मात करण्यासाठी विशेष बाब म्हणून जव्हार रुग्णालयाची क्षमता वाढविली जाईल.
स्त्री व बालक रूग्णालयही वेगळे केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.