जव्हार सेलवास प्रवास धोक्याचा
By admin | Published: April 30, 2016 03:34 AM2016-04-30T03:34:01+5:302016-04-30T03:34:01+5:30
जव्हार तालुक्यातील वडोली गावा जवळील रातून पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धोकादायक स्थितीत आहे.
जव्हार : जव्हार तालुक्यातील वडोली गावा जवळील रातून पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धोकादायक स्थितीत आहे. या रातूना पुलाला ७२ वर्ष उलटून गेल्याने, हा पूल दुरुस्तीच्या कामाचा राहीलेला नसल्याने, रातूना येथील धोकादायक पुलाच्या कामाला मजुरी देऊन, नवीन पूल बांधण्याची रातूना व वडोली ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
तालुक्यातील वडोली ग्रामपंचायत हद्दीतील रातूना पाड्याजवळ सेलवास रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस व नादुरुस्त असा धोकादायक स्थितीत जव्हार सेलवास मेन रोडवर पूल आहे. या धोकादायक पुलावरून रोज हजारो वाहने ये-जा करीत असून, अवजड वाहनेही चालू आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजू मोडकळीस आले आहेत. या पुलाचे आधार मोडून पडले आहेत. त्यातच अरुंद पूलामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक पूलाचे वेळेत काम न झाल्यास याचा फटका स्थानिक रहिवासी, रोज येणारी अवजड वाहने, यांना बअसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मोठी अडचण होणार आहे. हा रातूना पूल लेंदी नदीवर असल्याने धोका वाढला आहे. (वार्ताहर)
जव्हार सेलवास रोडवरील रातूना पुलाची दुरुस्ती व नवीन पूल बांधण्यासाठी येथील ग्रामस्थानी सतत मागणी केली आहे. मात्र शासनाने हा पूल वेळीच दुरुस्ती किवा नवीन बांधकाम न केल्यास दुर्घटना होऊन शकते, असे भयानक चित्र या मेन रोडवरील पुलाचे दिसत आहे.