जय ज्योती.. जय क्रांतीने निनादले विद्यापीठ

By Admin | Published: July 9, 2014 12:03 AM2014-07-09T00:03:13+5:302014-07-09T00:03:13+5:30

राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांनी पुणो विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार झाल्याबद्दल विद्यापीठाच्या आवारात जल्लोष करत आनंद साजरा केला.

Jay Jyoti .. Jai Kranti Nainadale University | जय ज्योती.. जय क्रांतीने निनादले विद्यापीठ

जय ज्योती.. जय क्रांतीने निनादले विद्यापीठ

googlenewsNext
पुणो : जय ज्योती.. जय क्रांती.., महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा विजय असो.. अशा घोषणा, तसेच ढोल, ताशा यांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी करून विविध सामाजिक  संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांनी पुणो विद्यापीठाचा  ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार झाल्याबद्दल विद्यापीठाच्या आवारात जल्लोष करत आनंद साजरा केला.
राज्य मंत्रीमंडळाने सोमवारी पुणो विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला.त्यामुळे आज सकाळी 11 वाजल्यापासून विविध संघटनांच्या व राजयकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणा व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.तर काही संघटनांनी विद्यापीठाच्या प्रवेश द्वारापासून महात्मा फुले यांच्या पुतळ्यार्पयत फेरी काढली.महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर महिलांनी फुगड्यांचे फेर धरले. तसेच काही संघटानांनी व व्यक्तींनी विद्यापीठ आवारात पेढे व मिठाई वाटली.
राज्याचे सार्वजनिक  बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे नेते कृष्णकांत कुदळे,महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख हरी नरके ,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते,डॉ.संजीव सोनवणो यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सदस्य व प्रशासकीय कर्मचारी, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ नामकरण कृती समितीचे निमंत्रक गौतम बेंगाळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  विद्यापीठातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सावित्रीच्या लेकींनी अभिवादन केले.ज्यांनी हाल आपेष्ठा सहन करून पुण्यातून स्त्री शिक्षणाचा पाया घातला. ज्यांच्यामुळे आज शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे,अशा क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणो विद्यापीठाला दिल्याबद्दल सुरू असलेल्या आनंदोत्सवात विद्यापीठातील काही विद्यार्थीनीही सहभागी झाल्या.या आनंदोत्सवाचे क्षण मोबाईल मध्ये टिपून ठेवण्यासाठी अनेकांचे हात उंचावलेले दिसले.
भारिप बहुजन महासंघातर्फे सदाशिव पेठेतील कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणो, युवक अध्यक्ष उमेश चव्हाण, अजय भालशंकर यावेळी उपस्थित होते.  महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे समता भूमी येथे माजी नगरसेवक नारायण चव्हाण यांच्या हस्ते पेढे वाटप आणि विद्याथ्र्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष धनंजय सोनसळे, सुधीर वाघ, राजु शेख, राजन पुणोकर, संतोष शिवरकर, विकी विलासागर यावेळी उपस्थित होते. 
प्रदेश युवक  इटक संघटनेतर्फे अॅड. राहुल म्हस्के यांच्या उपस्थितीत कोथरूड येथे झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.  
एनएसयुआयचे उपाध्यक्ष अतुल म्हस्के, जयश्री यादव, आण्णा ओव्हाळ, निलेश कंधारे, संदिप मोकाटे, धनंजय शेळके उपस्थित होते. राष्ट्रीय युवक कॉग्रेसच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष वैभव पंचमुख, संतोष व्हालकर, सुयोग कर्डीले, स्वप्निल मोरे, आकाश मल्लाव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
च्पुणो विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आल्याचा सर्वाना आनंद आहेच.परंतु,गेल्या काही कालावधीपासून जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल, अशी आशा छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
च्राष्ट्रीय महामार्गावरील टोल 6क् किलोमीटर अंतरावर असताना राज्यातील टोल 45  किमी अंतरावर का ? या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले,‘‘ देशातील सर्व राज्यांमध्ये टोलसाठी जे निकष आहेत तेच निकष महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रस्ते तालुक्यांना जोडणारे असल्याने त्यावरील टोल कमी अंतरावर आणि महामार्गावरील टोल 6क् किमी अंतरावर आहेत.’’

 

Web Title: Jay Jyoti .. Jai Kranti Nainadale University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.