जयचंद्र (बाबू) बांदेकर यांचे निधन
By admin | Published: June 14, 2017 12:41 AM2017-06-14T00:41:59+5:302017-06-14T00:41:59+5:30
गेल्या पिढीतील सुप्रसिद्ध चित्रपट संकलक व अनुबोधपट दिग्दर्शक जयचंद्र बांदेकर यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या पिढीतील सुप्रसिद्ध चित्रपट संकलक व अनुबोधपट दिग्दर्शक जयचंद्र बांदेकर यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. ‘बाबू’ बांदेकर या नावाने चित्रपट क्षेत्रात ते सुपरिचित होते.
बांदेकर यांनी चित्रपटसृष्टीसाठी अनेक अनुबोधपटांचे संकलन व दिग्दर्शन केले. त्यांच्या अनेक अनुबोधपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले.
दूरदर्शनच्या निवृत्त सहायक निदेशक व चित्रपट निर्माती नीना राऊत आणि ब्रिच कँडी रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय संचालक डॉ. सुनील बांदेकर यांचे ते वडील होते. दिग्दर्शक ओम राऊत हे त्यांचे नातू आहेत.
बांदेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे़