जयदेव ठाकरे यांची १८ला उलटतपासणी
By admin | Published: June 21, 2016 03:42 AM2016-06-21T03:42:27+5:302016-06-21T03:42:27+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १८ जुलैपासून उच्च न्यायालयात जयदेव ठाकरे यांच्या
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १८ जुलैपासून उच्च न्यायालयात जयदेव ठाकरे यांच्या उलटतपासणीला सुरुवात होणार आहे. ही उलटतपासणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकील घेतील,
असे न्या. पटेल यांनी सोमवारी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या इच्छापत्राला जयदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बाळासाहेबांनी संपत्तीतील बहुतांशी वाटा उद्धव ठाकरे यांना दिला. मात्र, जयदेव यांच्या नावे काहीच ठेवले नाही. जयदेव यांच्या म्हणण्यानुसार, ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहत नसले, तरी त्यांच्या नात्यात दुरावा नव्हता. त्यामुळे बाळासाहेब त्यांना संपत्तीत वाटा देणार नाहीत, हे शक्य नाही.
जयदेव यांच्या म्हणण्यानुसार, इच्छापत्र तयार करण्यात आले, त्या काळात बाळासाहेबांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. याचा फायदा घेऊन उद्धव यांनी बाळासाहेबांवर दबाव आणत, संपत्तीतील बहुतांश वाटा स्वत:च्या नावावर करून घेतला.
बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर २०१२ मध्ये जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा केला होता. या दाव्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे इच्छापत्र तयार करणारे एफ. डिसोझा, डॉक्टर जलील परकार, शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेबांशी घनिष्ठ संबंध असलेले अनिल परब यांची साक्ष नोंदवली आहे. (प्रतिनिधी)
संपत्तीतील वाटा
बदलत राहिला
बाळासाहेबांनी अनेक वेळा इच्छापत्र बनवले. मात्र, वारस तेच राहिले, परंतु त्यांच्या नावे देण्यात येणारा संपत्तीचा वाटा सतत बदलत राहिला, अशी साक्ष
अॅड. एफ. डिसोझा यांनी उच्च न्यायालयात नोंदवली.
ठाकरे यांनी पहिले इच्छापत्र
1997
मध्ये तयार केले. त्यांनतर, आठ ते नऊ वेळा त्यांनी इच्छापत्र बदलले. प्रत्येक वेळी बाळासाहेब इच्छापत्राचा मसुदा त्यांच्या रूममध्ये जाळत असत. अखेरीस
2011
मध्ये त्यांनी अंतिम इच्छापत्र तयार केले, अशीही माहिती अॅड. डिसोझा यांनी उच्च न्यायालयाला दिली.