जयंत पाटलांना घेरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रसद खोत की निशिकांत पाटलांना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:37 PM2019-07-25T12:37:24+5:302019-07-25T13:02:19+5:30

गेल्या पाच वर्षात वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी भाजपकडून विधानसभा निवडणुकीत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Jayant patil Against khot Or Nishikant Patil | जयंत पाटलांना घेरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रसद खोत की निशिकांत पाटलांना

जयंत पाटलांना घेरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रसद खोत की निशिकांत पाटलांना

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता राज्यात विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठी फिल्डिंग लावली आहे. जयंत पाटलांची दमछाक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत किंवा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. मात्र उमेदवारीची रसद कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

गेल्या पाच वर्षात वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी भाजपकडून विधानसभा निवडणुकीत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकेकाळी जयंत पाटील यांचे निकटचे सहकारी असलेले निशिकांत पाटील हे आता भाजपमध्ये आहेत. तर विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात ते रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे सदाभाऊ खोत हे पण जयंत पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटलांना घेरण्यासाठी मुख्यमंत्री नेमेकी कुणाला उमदेवारी देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

इस्लामपूर मतदारसंघ हा वाळवा तालुक्यासह व मिरज तालुक्यातील ८ गावांनी बनलेला आहे. या मतदारसंघात जयंत पाटील यांची पकड मजबूत आहे. मात्र मागील काही काळात या मतदारसंघात मोठ्याप्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यातील प्रमुख घडामोड म्हणजे सदाभाऊ यांना मिळालेले मंत्रिपद आणि जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले निशिकांत पाटील यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश यांचा विशेष उल्लेख होतो.

इस्लामपूर मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे तर युतीत भाजपकडे आहे. भाजपकडून सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील दोन्हीही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र जयंत पाटील यांचा विरोधात निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे नेमकी कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Jayant patil Against khot Or Nishikant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.