“भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत”; जयंत पाटील यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 04:17 PM2021-08-29T16:17:57+5:302021-08-29T16:20:10+5:30
भाजपमध्ये गेलेले अनेक बडे नेते पुन्हा राष्ट्रवादीत परत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
सांगली: मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सरकार परत येणार म्हणून भाजपमधील इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन झाले. आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेक बडे नेते पुन्हा राष्ट्रवादीत परत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. (jayant patil claims that leaders who joined bjp will come back in ncp)
“वैयक्तिक टीका कराल, तर जशास तशी रिॲक्शन मिळेल”; शिवसेना नेत्यांचा राणेंना इशारा
नारायण राणे यांच्या अटक व जामीन नाट्यानंतर पोलीस आणि गुंडांच्या बळावर ठाकरे सरकार चालतेय, अशी टीका करण्यात आली होती. या टीकेलाही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते वैभव शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेकांशी बोलणे सुरू असून, योग्य वेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र
मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ, राज्यात गुंडगिरी नाही
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना निधीच्या माध्यमातून त्रास देण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. एकनाथ खडसे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर दबाव टाकून काहीच निष्पन्न होणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. राज्यात कुठेही गुंडगिरी होत नाही. पोलीस त्यांचे काम करत आहेत. आता सरकार पाच वर्षे हलणार नसल्याची खात्री पटल्याने पोलीस आणि प्रशासन विरोधकांचे ऐकत नाहीत. यामुळे चंद्रकांत पाटील निराश आहेत. या निराशेतून चंद्रकांत पाटील पोलिसांवर राग व्यक्त करीत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.