Delhi Election Results: 'भाजपचा बुडबुडा फुटला' ; दिल्ली विधानसभा निकालावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:52 PM2020-02-11T17:52:02+5:302020-02-11T17:55:23+5:30
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा पराभव असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.
मुंबई : दिल्ली विधानसभा निकालाचे सर्वच आकडे जवळपास आले असून, आम आदमी पार्टीने पुन्हा विजय मिळवला आहे. तर भाजप आणि काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्लीच्या निकालावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा आता फुटला आहे. दिल्लीकरांनी मतदानाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट केला आहे. तर भाजपाची लोकप्रियतेची लाट आता ओसरली असल्याचे दिल्लीकरांनी सूचित केले असल्याचा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा आता फुटला आहे. दिल्लीकरांनी मतदानाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट केला. दिल्लीकरांनी सूचित केले आहे की भाजपाची लोकप्रियतेची लाट आता ओसरली आहे. @ArvindKejriwal@AamAadmiParty@BJP4Indiapic.twitter.com/MKBlgB78hP
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 11, 2020
तर गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं काम आणि भाजपनी त्यांच्या वाट्यात निर्माण केलेले अडथळे पाहून दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या बाजूने कौल दिला आहे. यातच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा पराभव असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.