...तर शेतकरीच सरकार उलथवून टाकतील - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:44 AM2017-07-28T02:44:55+5:302017-07-28T02:44:59+5:30

सरकारने राज्यातील शेतकºयांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

jayant patil, farmers, protest | ...तर शेतकरीच सरकार उलथवून टाकतील - जयंत पाटील

...तर शेतकरीच सरकार उलथवून टाकतील - जयंत पाटील

Next

मुंबई : सरकारने राज्यातील शेतकºयांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. वारंवार बदलले जाणारे निर्णय, जाचक अटी व निकष यामुळे सर्वसामान्य शेतकºयांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था व साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी न केल्यास आगामी निवडणुकीत राज्यातील शेतकरीच हे सरकार उलथवून टाकतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. जयंत पाटील यांनी दिला. कर्जमाफीसाठी शेतकºयांना आॅनलाइन फॉर्म भरण्यासाठी सांगितले गेले, परंतु सदर फॉर्म नेटवर्क आणि कनेक्टिव्हीटीअभावी डाऊनलोड होत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे, त्यामुळे आॅनलाइन अर्जाच्या सक्तीमुळे महाराष्ट्रातील शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे.

Web Title: jayant patil, farmers, protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.