Jayant Patil: "ज्या बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं, त्यांच्याच घरावर जाऊन...", जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 03:50 PM2022-04-24T15:50:22+5:302022-04-24T15:50:41+5:30

Jayant Patil:"महाराष्ट्राने इतके घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही, सरकार पाडण्यासाठीच भाजपची धडपड सुरु."

Jayant Patil: "Going to the house of Balasaheb who taught Hindutva to BJP is not good", Jayant Patil slams BJP | Jayant Patil: "ज्या बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं, त्यांच्याच घरावर जाऊन...", जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

Jayant Patil: "ज्या बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं, त्यांच्याच घरावर जाऊन...", जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

औरंगाबाद: राज्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील परिस्थितीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला. "राज्याने इतकं घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांपासून किती सन्मानाने राहिलेला आहे. पण, आता वातावरण खराब करण्याचा जाणीवपूर्वक प्रयन्त केला जातोय," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

'बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं'
ते पुढे म्हणाले की, "सध्या राज्याच्या राजकारणात अराजकता माजली आहे. काहीच करता येत नसल्याने भाजप त्यांच्याच आमदार आणि खासदारांना या गोष्टी करायला लावत आहेत. सरकार पाडण्यासाठीच त्यांची ही धडपड सुरु आहे. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला हिंदुत्त्व शिकवलं, त्यांच्याच दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणत असाल, तर है दुर्दैव आहे, असंही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या कृत्याचं समर्थन
यावेळी जयंत पाटलांनी शिवसेनेच्या कृत्याचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, "कुणी थेट कुणाच्या घरात शिरले तर स्वसंरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. शिवसेनेने यापूर्वी अनेक तीव्र आंदोलने केले आहेत, त्यामुळे आताचे कृत्य सौम्य आहे. भाजपच्या कृतीवरुन ते किती खालच्या स्तरावर राजकारण करतंय, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काहीही करुन विरोधकांना राज्यातील सत्ता मिळवायची आहे, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे सर्व उपाय करुन झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असा प्रयत्नही दिसत आहे. 

Web Title: Jayant Patil: "Going to the house of Balasaheb who taught Hindutva to BJP is not good", Jayant Patil slams BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.