जयंतराव: फेसबुक वरून सुटले; ट्विटरवर अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 08:11 PM2019-08-11T20:11:47+5:302019-08-11T20:19:35+5:30
जयंत पाटील हे पूरग्रस्तांना मदतीसाठी वाटप करत असलेल्या मदत बॉक्सवर त्यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आले असल्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात वायरल झाला होता.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणक यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पूरग्रस्तांना मदत करताना मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावून जाहिरातबाजी केली असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे हा फोटो खुद्द जयंत पाटलांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केला होता. मात्र माध्यमात बातमी येताच त्यांनी तो फोटो डिलीट केला. तर हा फोटोच खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. मात्र खुद्द जयंत पाटील यांनी ट्विट करत स्टीकर वापरल्याची कबुली दिली, आणि त्यांनतर पाटील हे पुन्हा सोशल मिडीयावर ट्रोल होताना पहायला मिळाले. त्यामुळे फेसबुक वरून सुटले आणि ट्विटरवर अडकले अशी अवस्था जयंत पाटलांची झाली असल्याची चर्चा आहे.
जयंत पाटील हे पूरग्रस्तांना मदतीसाठी वाटप करत असलेल्या मदत बॉक्सवर त्यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आले असल्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात वायरल झाला होता. विशेष म्हणजे जयंत पाटलांच्या अधिकृत पेजवर सुद्धा हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. मात्र 'लोकमत'वर बातमी प्रसिध्द होताच तो फोटो डिलीट करण्यात आला. तर जयंत पाटील यांची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयटी सेलकडून हा फोटो खोटा असल्याचा दावा करण्यात आला. एवढ्च नव्हेतर राष्ट्रवादीचे नेतेमंडळी सुद्धा पाटलांची बाजू मांडण्यासाठी समोर आले.
मात्र 'लोकमत'ने जयंत पाटलांच्या पोस्टची स्क्रीनशॉट समोर आणल्याने तो फोटो खरा होता, आणि खुद्द जयंत पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून टाकण्यात आला असल्याचे सिद्ध झाले.
राष्ट्रवादी आयटी सेलकडून कितीही बचाव सुरु असला तरीही, जयंत पाटील यांना आपली चूक लक्षात आली, आणि त्यांनी शेवटी ट्विटर आपली बाजू मांडली. मात्र यावेळी जयंत पाटील यांनी खुद्द स्टीकर वापरल्याची कबुली दिल्याने ते पुन्हा सोशल मिडीयावर ट्रोल होताना पहायला मिळाले. त्यामुळे फेसबुक वरून सुटले आणि ट्विटरवर अडकले अशी अवस्था जयंत पाटलांची झाली असल्याचे बोलले जात आहे.