अब्जावधींच्या ऑनलाईन घोटाळा प्रकरणी जयंत पाटील अडचणीत ?

By Admin | Published: June 14, 2016 12:27 PM2016-06-14T12:27:44+5:302016-06-14T12:30:26+5:30

आघाडी सरकारच्या काळात 2001 ते 2009 मध्ये राज्यात अब्जावधींचा ऑनलाईन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे

Jayant Patil in trouble in connection with online bill scam? | अब्जावधींच्या ऑनलाईन घोटाळा प्रकरणी जयंत पाटील अडचणीत ?

अब्जावधींच्या ऑनलाईन घोटाळा प्रकरणी जयंत पाटील अडचणीत ?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 14 - आघाडी सरकार सत्तेत नसूनही त्यांच्या नेत्यांवर होणारे आरोप आणि कारवाई यामुळे नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आघाडी सरकारचा अजून एक घोटाळा समोर आला आहे. आघाडी सरकारच्या काळात 2001 ते 2009 मध्ये राज्यात अब्जावधींचा ऑनलाईन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील याचं नाव आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 
 
या संपूर्ण आरोपांमध्ये लॉटरीसंबंधी केंद्रानं घालून दिलेले निकषांचं उल्लंघन करणं, एकाच कंपनीला ऑनलाईन लॉटरी चालवण्याचा ठेका देणं असे अनेक आरोप आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, लॉटरी संचलनालयाच्या तत्कालीन आयुक्त कविता गुप्ता आणि अनेक अधिकारी या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
 
संपूर्ण गैरव्यवहारात दरवर्षी 25 ते 30 हजार कोटींचा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. म्हणजेच 9 वर्षांत हा आकडा तब्बल 300 हजार कोटींपर्यंत जाऊन पोहोचतो.
 

Web Title: Jayant Patil in trouble in connection with online bill scam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.