औरंगजेबही शिवायचा टोप्या; 'मी सावरकर'वरून जयंत पाटलांचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:25 PM2019-12-17T12:25:07+5:302019-12-17T12:25:41+5:30
अभिनंदनाच्या वेळी दरेकरांनी "मै भी सावकर हू" लिहिलेली भगवी टोपी घातलेली नव्हती. त्यावर पाटील म्हणाले, दरेकरांना टोपी घातलेली नसून ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात.
मुंबई - काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सावकर यांना उद्देशून भाजपवर केलेल्या टीकेचे पडसाद विधानसभेतही दिसून आले होते. विरोधीपनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्रमक पावित्रा घेत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच 'मै भी सावरकर' असं लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान करून निषेध नोंदवला. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला टोप्यांवरून टोला लगावला.
अर्थमंत्री जयंत पाटील आपल्या हजरजवाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. विधानसभेत त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला. विधानसभेत सावरकरांच्या मुद्दावर लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 'मै भी सावकर' अस लिहिलेल्या टोप्या परिधान करून लक्ष वेधले होते. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
दरम्यान विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात पाटील म्हणाले की, औरंगजेब देखील फावल्या वेळेत टोप्या शिवण्याचे काम करत होता. पुढील पाच वर्षांत भाजपवर देखील अशीच स्थिती येणार असून त्यांना काही काम उरणार नसल्याचे पाटील म्हणाले. त्यांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.खुद्द पाटील यांना देखील यावेळी हसू आवरता आले नाही.
अभिनंदनाच्या वेळी दरेकरांनी "मै भी सावकर हू" लिहिलेली भगवी टोपी घातलेली नव्हती. त्यावर पाटील म्हणाले, दरेकरांना टोपी घातलेली नसून ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात.