नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर
By admin | Published: November 15, 2016 06:13 AM2016-11-15T06:13:55+5:302016-11-15T06:13:55+5:30
९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली. बुजुर्ग रंगकर्मीचा
मुंबई : ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली. बुजुर्ग रंगकर्मीचा उचित सन्मान झाल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त होत आहे. तथापि, संमेलनस्थळासंदर्भात येत्या काही दिवसांत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निर्णय घेणार आहे.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेची कार्यकारिणी आणि नियामक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत जयंत सावरकर यांची एकमताने निवड करण्यात
आल्याचे परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी सांगितले. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जयंत सावरकर यांच्यासह अशोक समेळ, बापू लिमये, प्रशांत दळवी, प्रवीण कुलकर्णी, (पान १ वर) विनायक केळकर आणि श्रीनिवास भणगे यांचे अर्ज नाट्य परिषदेकडे आले होते. यापैकी प्रशांत दळवी यांचे संमतीपत्र नाट्य परिषदेकडे न आल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला नाही. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत उर्वरित नावांवर विचारविनिमय होऊन जयंत सावरकर यांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)