‘जयंतराव, भाजपच्या वळचणीला या’

By admin | Published: December 27, 2016 01:22 AM2016-12-27T01:22:38+5:302016-12-27T01:22:38+5:30

नगरपालिका निवडणुकीत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरूंग लावला आहे. शहाणे असतील तर जयंत पाटील

'Jayantrao, BJP's handiwork' | ‘जयंतराव, भाजपच्या वळचणीला या’

‘जयंतराव, भाजपच्या वळचणीला या’

Next

सांगली : नगरपालिका निवडणुकीत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरूंग लावला आहे. शहाणे असतील तर जयंत पाटील यांच्यासह दक्षिण महाराष्ट्रातील नेत्यांनी भाजपच्या वळचणीला यावे, असे जाहीर आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.
अर्थात कोणाला पक्षात घ्यायचे हे मात्र आम्ही ठरवू, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वर्षभरातील कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य शासनाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने देश व राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पाळला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jayantrao, BJP's handiwork'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.