जीन्स,टी-शर्ट घालणं हे 'बॉम्बे कल्चर'का? हायकोर्टाच्या प्रश्नावर पत्रकारांचं वॉकआउट
By admin | Published: March 29, 2017 10:10 PM2017-03-29T22:10:05+5:302017-03-29T22:10:05+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी केलेल्या टिप्पणीवर पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी केलेल्या टिप्पणीवर आज पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधिशांच्या टिप्पणीने दुखावलेल्या पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला.
जीन्स आणि टी शर्ट घालणं ही योग्य वेशभुषा आहे का? असा प्रश्न चेल्लूर यांनी उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना विचारला. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या संपाबाबतच्या याचिकेवर न्या. चेल्लूर आणि न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना न्या. चेल्लूर यांनी ही टीप्पणी केली. अशी वेशभुषा म्हणजे 'बॉम्बे कल्चर' आहे का असं त्यांनी पत्रकारांना विचारलं.
ही टीप्पणी करण्यात आली तेव्हा जवळपास 10 टीव्ही चॅनेल्सचे आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी कोर्टात हजर होते. यापूर्वी 2015 मध्येही एका महिला पत्रकाराला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यापासून तेथील पोलिसांनी रोखलं होतं. त्या महिला पत्रकाराने स्लिव्हलेस ड्रेस घातला होता. 2011 मध्ये कोर्टाने केलेल्या एका नियमाचा आधार त्यावेळी घेतला गेला होता.