जेईई परीक्षेतही बदललेल्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 04:33 AM2020-02-11T04:33:40+5:302020-02-11T04:33:48+5:30

जानेवारी-एप्रिलच्या परीक्षेत बदल : ३ तासांची वेळ असणार

The JEE exam will also be based on the changed pattern | जेईई परीक्षेतही बदललेल्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

जेईई परीक्षेतही बदललेल्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एप्रिल महिन्यात होणाऱ्या दुसºया जेईई मेन्स परीक्षा-२०२० करिता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जानेवारीत जेईई मेन्स परीक्षेत उत्कृष्ट गुण न मिळवू शकलेल्या उमेदवारांना एप्रिलमध्ये होणाºया जेईई मेन्स परीक्षेत गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. जेईई मेन्स परीक्षा एप्रिल महिन्यात ५, ७, ९ आणि ११ एप्रिल, २०२० रोजी होणार असून, ही परीक्षा उत्तीर्ण करणाºया १२वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकेल. मात्र, जानेवारी, २०२० प्रमाणे या परीक्षेतही प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत.


बी.आर्क आणि बी. प्लॅनिंगची पात्रता ठरविलेल्या निकषांच्या आधारे आणि संबंधित विषय तज्ज्ञांच्या सल्ल्याने बीई, बी.टेक, बी. आर्क आणि बी. प्लॅनिंगच्या प्रश्नपत्रिकेचे प्रारूप व प्रश्नांच्या संख्येत बदल करण्यात आले असून, यासाठी जॅब (जेईई अपेक्स बॉडी)ची परवानगी घेण्यात आली आहे.


नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कॉम्प्युटराइज्ड आधारित घेतल्या जाणार आहे.
बीई/बीटेकच्या परीक्षांत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या ३ विषयांचा समावेश असणार असून, २० मल्टिपल चॉइस प्रश्न तर ५ संख्यात्मक प्रश्नांचा समावेश असेल. संख्यात्मक प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसले, तरी मल्टिपल चॉइस प्रश्नांसाठी-१ गुण असेल. आर्किटेक्चरच्या परीक्षेत गणित, रेखांकन आणि योग्यता असे ३ भाग असणार असून, ४०० गुणांच्या परीक्षेसाठी ३ तासांची वेळ असेल.

अशी असेल गुणांची विभागणी
प्लॅनिंगच्या परीक्षेत गणिताच्या भागासाठी २५ प्रश्न, योग्यतेसाठी ५०, तर प्लॅनिंगवर आधारित २५ प्रश्न असणार आहेत. बी.आर्क आणि बी. प्लॅनिंगच्या आधी पार्टच्या टेस्टमध्ये मुख्यत: अ‍ॅनालिटिकल रिजनिंग, मेंटल अ‍ॅबिलिटी, न्यूमेरिकल आणि व्हर्बल यावर प्रश्न विचारण्यात येतील.

Web Title: The JEE exam will also be based on the changed pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.