जेईई मेनचा निकाल जाहीर

By Admin | Published: April 28, 2016 06:18 AM2016-04-28T06:18:38+5:302016-04-28T06:18:38+5:30

अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जेईई मेनच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

JEE Men's Result | जेईई मेनचा निकाल जाहीर

जेईई मेनचा निकाल जाहीर

googlenewsNext

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जेईई मेनच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात १ लाख ९८ हजार २२८ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरल्याची घोषणा माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) करण्यात आली आहे.
देशभरातील १३१ केंद्रांवर ३ ते १० एप्रिल या कालावधीत आॅनलाइन आणि आॅफलाईन पद्धतीने जेईईची परीक्षा घेण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा परीक्षेसाठी ९ लाख ७४ हजार २३० विद्यार्थी बसले होते.
यातील १ लाख ९८ हजार २२८ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यात आॅनलाईन
परीक्षेत १९ हजार ८२० तर
आॅफलाईन परीक्षेत १ लाख ७८ हजार ४०८ विद्यार्थी असल्याची
माहिती सीबीएसई कडून देण्यात आली.

Web Title: JEE Men's Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.