2500 रुपयात करा महाराष्ट्रातील नव्या मार्गावर विमानप्रवास
By Admin | Published: March 30, 2017 01:43 PM2017-03-30T13:43:45+5:302017-03-30T15:06:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेत महाराष्ट्रतील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर 2500 रुपयात विमानप्रवास करता येणार आहे.
नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली. उड्डाण या योजनेनुसार तासभर प्रवासाच्या पहिल्या निम्या जागांसाठी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना 2500 रुपये मोजावे लागतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल.
नांदेड- मुंबई, नांदेड - हैदराबाद, नाशिक - मुंबई, नाशिक - पुणे, कोल्हापूर - मुंबई, जळगाव -मुंबई आणि सोलापूर - मुंबई उड्डाण योजनेच्या माध्यामांतून हे नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
उडाण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच गुंतवणूक वाढेल असा विश्वास नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला आहे.
#UDAN network will cover the whole country, giving a major economic boost to hinterland areas. New routes announced today #TransformingIndiapic.twitter.com/oOUHHrJWo7
— Ashok Gajapathi Raju (@Ashok_Gajapathi) March 30, 2017
New #UDAN routes awarded on 30.03.2017 (5/5) pic.twitter.com/GHT4kc8WE0
— Ashok Gajapathi Raju (@Ashok_Gajapathi) March 30, 2017
New #UDAN routes awarded on 30.03.2017 (4/5) pic.twitter.com/x1AuNPoMHs
— Ashok Gajapathi Raju (@Ashok_Gajapathi) March 30, 2017
New #UDAN routes awarded on 30.03.2017 (3/5) pic.twitter.com/tiCWd3CRtk
— Ashok Gajapathi Raju (@Ashok_Gajapathi) March 30, 2017
New #UDAN routes awarded on 30.03.2017 (1/5) pic.twitter.com/CpT0TCXJrM
— Ashok Gajapathi Raju (@Ashok_Gajapathi) March 30, 2017