कोकणच्या हापूसचा परदेशात झिम्मा!
By Admin | Published: March 3, 2016 04:46 AM2016-03-03T04:46:17+5:302016-03-03T04:46:17+5:30
कोकणचा हापूस आंबा अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युरोप, जपान या देशांमध्ये जाण्यास आता सज्ज झाला आहे. आंबा निर्यात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेसाठी मोठ्या क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत
पुणे : कोकणचा हापूस आंबा अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युरोप, जपान या देशांमध्ये जाण्यास आता सज्ज झाला आहे. आंबा निर्यात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेसाठी मोठ्या क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यशिवाय अन्नतपासण्याही केल्या आहेत.
रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंब्याला जगभरातून मागणी आहे. मात्र प्रत्येक देशांचे आंबा निर्यातीसाठीचे नियम वेगवेगळे आहेत. त्यानुसार पिकवलेला आंबा असेल तरच तो संबंधित देश स्वीकारतात. अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, जपान या देशांचे निर्यातीचे नियम कठोर आहेत. त्यामुळे आतापर्यंत या देशांमध्ये आंबा जाण्याचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामागचे एक प्रमुख कारण होते प्रक्रिया प्रकल्पांची कमतरता. त्यामुळे गेल्यावर्षीपर्यंत महाराष्ट्रातून दुबईसह आखाती देशांमध्येच आंब्यांची मोठ्याप्रमाणात निर्यात होत होती. ही निर्यात आणखी वाढविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने पणन विभाग आणि ‘आपेडा’च्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या देशांमध्ये यंदा पहिल्यांदाच काही हजार मेट्रिक टन आंबा जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिका आणि आॅस्ट्रेलियात आंबा पाठविण्यासाठी ‘कोबाल्ट ६०’ ही इरीडिएशन प्रक्रिया पद्धती करणे आवश्यक असते. (प्रतिनिधी)