सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची गोळी झाडून आत्महत्या ; गाडीत सापडली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:25 AM2018-02-28T04:25:25+5:302018-02-28T04:25:25+5:30

गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

Jigna Thakkar shot dead in irrigation scam; Documents found in the car | सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची गोळी झाडून आत्महत्या ; गाडीत सापडली कागदपत्रे

सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची गोळी झाडून आत्महत्या ; गाडीत सापडली कागदपत्रे

Next

मुंबई : गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोेलिसांनी ठक्करच्या गाडीतून सिंचन घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्याचा तपास सुरू आहे.
घाटकोपरला राहणारा जिगर सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर येथील त्याच्या कार्यालयातील काम उरकून मरीन ड्राइव्ह येथील एका बँकेत आला होता. तेथून त्याने मरिन प्लाझा गाठले. नंतर त्याने चालक सुनील सिंग याला गाडी पार्क करायला सांगितले.
ड्रायव्हरला बाजूला जायला सांगून त्याने आपल्याकडील परवाना असलेल्या रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपविले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन जीटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
घोटाळ्याचे आरोपपत्रही दाखल-
मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा मातीकाम व बांधकामाचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा अ‍ॅण्ड कंपनी आणि डी ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. कंपनीला देण्यात आले होते. त्यात गैरप्रकार झाल्याचा दावा करीत एसीबीने दोन्ही कंपन्यांचे संचालक कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते व विभागीय लेखाधिकारी चंदन जिभकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर जानेवारीत एसीबीकडून ४ हजार ४५७ पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे.

Web Title: Jigna Thakkar shot dead in irrigation scam; Documents found in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.