JIO ची नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर

By admin | Published: April 11, 2017 08:01 PM2017-04-11T20:01:28+5:302017-04-11T20:02:40+5:30

ट्रायने रिलायन्सने जिओला प्राइमसोबत दिलेली तीन महिन्यांची कॉम्पलिमेंटरी सेवा बंद करा असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर दिली आहे

Jio's new look again offers a new look | JIO ची नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर

JIO ची नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - ट्रायने रिलायन्सने जिओला प्राइमसोबत दिलेली तीन महिन्यांची कॉम्पलिमेंटरी सेवा बंद करा असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रुपात पुन्हा जुनीच ऑफर दिली आहे. या नव्या ऑफरचे नवा जिओ धन धना धन असे असून जिओ समर सरप्राइज ऑफरप्रमाणेच सर्व सुविधा याद्वारे मिळणार आहेत. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला 15 दिवसांची वाढीव मुदत मागे घ्या तसेच प्राइम मेंबरशिप आणि समर सरप्राइज ऑफरही मागे घेण्यासाठी आदेश दिले होते.
जिओच्या धन धना धन या नव्या ऑफरद्वारे तुम्हाला तीन महिन्यांसाठी अमर्यादित डेटा मिळणार आहे, फ्री एसएम एस सर्व्हिस, जिओ अ‍ॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ प्राइमचे सबस्क्रिप्शन घेऊन 309 आणि 509 रुपये भरणे आवश्यक आहे. ही ऑफर घेतल्यास दररोज 2 जीबी 4 जी डेटा वापरता येणार आहे. ज्या लोकांना जिओ समर सरप्राइज ऑफर वापरता येणार नाही त्यांच्यासाठी ही नवी ऑफर देण्यात येणार आहे.
हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी 15 दिवसांची मुदत वाढवली होती. जिओकडून सर्व ग्राहकांना दररोज 1 ॠइ मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती.
मात्र, रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना 15 एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणं गरजेचं करण्यात आलं होतं. 15 एप्रिल पर्यंत ज्या ग्राहकांनी या ऑफरसाठी प्राइम मेंबरशिपची नोंदणी करुन 303 रुपये भरले त्यांना तीन महिन्यांची सेवा मोफत मिळणार आहे. ट्रायच्या आदेशानंतर जुनी ऑफर त्यांना गुंडाळावी लागली परंतु नव्या धन धना धन ऑफर द्वारे तीच सेवा रिलायन्स जिओ पुरवणार आहे.

Web Title: Jio's new look again offers a new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.