शासकीय बंगला म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच होता; निरोप घेताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:05 PM2022-07-01T23:05:14+5:302022-07-01T23:11:19+5:30
काल माझ्या शासकीय बंगल्यामधील सर्व कर्मचारी व मंत्रालयातील सर्व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी मला भावपूर्ण निरोप दिला, असे ...
काल माझ्या शासकीय बंगल्यामधील सर्व कर्मचारी व मंत्रालयातील सर्व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी मला भावपूर्ण निरोप दिला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माझ्याबरोबर त्यांचे अडीच वर्षातील वागणे यामध्ये कुठेही ते कर्मचारी आहेत आणि मी मंत्री आहे असे नव्हते. त्यांचे आणि माझे अत्यंत खेळीमेळीचे संबंध होते. रात्री उशिरापर्यंत जेव्हा मी काम करत बसायचो तेव्हा मला पाणी देणे, गरम-गरम जेवण देणे, अडीच वर्षांमध्ये कोणी माझ्या शासकीय बंगल्यावर आला असेल आणि तो जेवण न-करता गेला असेल असं मला नाही वाटत की महाराष्ट्रात कोणी असेल, असे ते म्हणाले. ए 3 म्हणजे जवळ-जवळ अन्नपूर्णाच झाली होती. माझे आचारी तसेच जेवण वाढणाऱ्यांनीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. काल सगळ्यांनी एकत्र येऊन मला भावपूर्ण निरोप दिला, असे ते म्हणाले.
आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणच्या ऑफिसला जाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या. जे 10 वर्षांत होऊ शकलं नाही ते मागच्या अडीच वर्षांत झालं. 10 वर्षांत जेवढे उत्पन्न होते ते मागच्या अडीच वर्षांत झाले. 10 वर्षांत जेवढी देकारपत्र दिली गेली तेवढी ह्या अडीच वर्षांत दिली गेली, असे आव्हाड म्हणाले.