आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:56 PM2020-06-26T12:56:09+5:302020-06-26T12:57:16+5:30

अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची केंद्र सरकारवर टीका

Jitendra Awhad criticized central government over petrol and diesel price hike | आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला

आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला

Next

सलग 20 दिवस पेट्रोलडिझेलच्या किमती वाढल्या आहेत. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवल्याने राजधानीत डिझेलची किंमत प्रथमच 80 रुपयांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी दरवाढ करण्यात आल्याने डिझेलचे दर एका लिटरला 10.63 रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर लिटरला 14 पैशांनी वाढून 80.02 रुपये असे झाले आहेत. प्रथमच डिझेलच्या दराने 80 रुपयांची पातळी ओलांडलेली दिसून आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. 

India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते. त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं की,'' बिग ब्रेकिंग, भारत सरकारचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय.. आता कच्चं तेल इराककडून खरेदी केलं जाणार नाही, तर जनतेचं तेल काढलं जाईल.''


दरम्यान, आव्हाड यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनाही खोचक टोमणा मारला. बच्चन यांचे 2012सालचे ट्विट व्हायरल करून आव्हाड यांनी निशाणा साधला.  2012मध्ये बच्चन यांनी पेट्रोलची किंमत 8 रुपयांनी वाढल्यानंतर एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की,''पेट्रोल 7.5रुपयांनी महागलं. पेट्रोल पंपवरील कर्मचारी- कितने का डालू? मुंबईकर - 2.4 रुपयांच्या पेट्रोलनं कारवर स्प्रे करून टाक भावा, कार पेटवायची आहे.'' 

मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा

 

Web Title: Jitendra Awhad criticized central government over petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.