जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा आता गोव्यात खिश्चन पद्धतीनं पार पडला विवाह सोहळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:16 AM2021-12-20T00:16:17+5:302021-12-20T00:18:34+5:30
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे नुकतेच 7 डिसेंबरला विशेष मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी पद्धतीने लग्न झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे नुकतेच 7 डिसेंबरला विशेष मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी पद्धतीने लग्न झाले होते. एकीकडे अनेक नेते आपल्या मुलांचे लग्न अत्यंत थाटामाटात लावत असतानाच, आव्हाड यांनी मात्र अत्यंत साधे पणाने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. आव्हाडांची कन्या नताशा हिचे लग्न एलन पटेलसोबत झाले आहे. यानंतर आता रविवारी या जोडप्याचा गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने थाटात विवाह पार पडला. एलन पटेलच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हे लग्न गोव्यात पार पडले आहे. यासंदर्भात स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटही केले आहे.
For the information of some perverts # #Alan is a #Christian so it had to b a Christian #wedding his family Chose #Goa#Alan had him choise him of wedding and #NATASHA had her own choice
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 19, 2021
Both are different individuals and respected their choice of wedding pic.twitter.com/DizuqvQDZf
नताशा आणि एलन यांच्या या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिव सेना नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते, असे समजते.
लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं -
नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी तिचं लग्न रजिस्टर पद्धतीने केलं होतं.
मुलीच्या लग्नावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते. वडिलांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून नताशा आव्हाडही भावूक झाली होती. २५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे, असे सांगताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू आवरत नव्हते.