"...तरीही मला माफ करा"; जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही केलाय बंद, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 08:52 AM2023-08-05T08:52:17+5:302023-08-05T08:55:27+5:30

या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

Jitendra Awhad informed party workers that he has decided not to celebrate his birthday | "...तरीही मला माफ करा"; जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही केलाय बंद, कारण काय?

"...तरीही मला माफ करा"; जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही केलाय बंद, कारण काय?

googlenewsNext

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाड आज २४ तासांसाठी अज्ञातस्थळी जाणार आहेत. त्याचसोबत त्यांनी स्वत:चा फोनही रात्री १२ वाजेपर्यंत बंद करणार असल्याची माहिती आव्हाडांनी ट्विटरवरून दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगितलंय की, ५ ऑगस्ट...माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत ५ तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या ५ तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही असं ते म्हणाले.

त्याशिवाय देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

तसेच तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरीही मला माफ करा. मी ४ ऑगस्ट रात्री बारापासून ते ५ ऑगस्ट रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे. लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरून कार्यकर्त्यांना दिली आहे.

Web Title: Jitendra Awhad informed party workers that he has decided not to celebrate his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.