Jitendra Awhad Video: ती माझ्या अंगावर पडली असती तर...; जितेंद्र आव्हाडांनी केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 04:10 PM2022-11-15T16:10:44+5:302022-11-15T16:11:27+5:30

Jitendra Awhad interview after Anticipatory Bail: आता मी व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतेय, काय प्लॅनिंग करतात वा, असे आव्हाड म्हणाले. 

Jitendra Awhad interview after Anticipatory Bail: If she had fallen on me...; Jitendra Awhad made serious allegations on rida rashid in molestation case | Jitendra Awhad Video: ती माझ्या अंगावर पडली असती तर...; जितेंद्र आव्हाडांनी केले गंभीर आरोप

Jitendra Awhad Video: ती माझ्या अंगावर पडली असती तर...; जितेंद्र आव्हाडांनी केले गंभीर आरोप

googlenewsNext

जितेंद्र आव्हाड यांना भाजपाच्या महिला कार्यकर्त्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यानंतर आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया लोकमतने घेतली. यामध्ये आव्हाड यांनी या महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. एक दिवस ही महिला मुंब्र्याला आग लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी तक्रारदार महिलेवर टीका केली आहे. 

दोन्ही गुन्हे खोटे आहेत. पहिल्या गुन्ह्यात मी त्या माणसाला बाहेर घेऊन जाताना दिसतोय. त्या माणसाची मुलाखत आहे. कालच्या घटनेत मी त्या महिलेला गर्दीत जाऊ नका असा सल्ला दिला. माझा जर काही उद्देश असता... हा पूर्वनियोजित कट होता. ती महिला समोरून चालत येत होती. जितेंद्र आव्हाड समोरून चालत येतोय म्हटल्यावर समोरचा माणूस बाजुला होतो. एवढ्या गर्दीत एकटी महिला कधी येत नाही. तिच्या डोक्यात आधीच प्लॅन होता. ती मुद्दामहून समोरून चालत येत होती, असे आव्हाड म्हणाले. 

नशीबाने मी तुम्ही बाजुला व्हा म्हणून बाजुला केले. उद्या जर त्या माझ्या अंगावर पडल्या असत्या तर मी काहीही बचाव करू शकलो नसतो. देवाने मला वाचविले, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर दिली. आता मी व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतेय, काय प्लॅनिंग करतात वा, असे आव्हाड म्हणाले. 
अनेक महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या माझ्याबाजुने उभ्या राहिल्या. अंजली दमानियांशी आमच्या वेगळ्या लढाया असतात. जितेंद्र आव्हाड असे काही करेल यावर विश्वास बसत नाही या भगिनींच्या भावना सुखावणाऱ्या आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी आभार मानले. 

एवढे नीच राजकारण ही महिला मुंब्र्यात आल्यानंतर सुरु झालेय. छट पुजेत असेच कांगावे केले. तिचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तिने अनेक पुरुषांना त्रास दिला आहे. आरएसएसचे पुराणिक म्हणून आहेत, तिने त्यांचे काय केलेय हे पहा. हे तिचे हक्काचे प्रयोग आहेत. ही महिला एके दिवशी मुंब्र्याला आग लावेल, याचे आज मी भाकीत करतोय, अशी टीका आव्हाड यांनी केली. 

पोलीस मलाच सांगत होते, वरून दबाव आहे. अरे व्हिडीओ पहायला पाहिजे होता. दबावाखाली उद्या तुम्ही बलात्काराच्या आरोपात आत टाकाल, अशी टीका आव्हाड यांनी पोलिसांवर केली. आम्ही उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. मुंबईतील दहा महिला कार्यकर्त्या हायकोर्टात याविरोधात दाद मागणार आहेत. प्रीती शर्मा मेनन सारख्या महिलांशी आमचे विविध गोष्टींवरून वाद आहेत. या सर्व महिला माझ्या बाजुने उभ्या राहिल्या. मी काय कमावले, हेच कमावले, असे सांगत आव्हाड भावूक झाले. 

ज्या पद्धतीने पोलीस वागतायत ते वाईट आहे. शपथ घेताना जे म्हटलेले त्यानुसार वागायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही सरकारचे नोकर नसता. सरकारी नोकर असता, यामुळे कायद्यानेच वागले पाहिजे होते, असेही आव्हाड म्हणाले. 
 

Web Title: Jitendra Awhad interview after Anticipatory Bail: If she had fallen on me...; Jitendra Awhad made serious allegations on rida rashid in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.