जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:52 PM2024-11-29T16:52:55+5:302024-11-29T16:55:08+5:30

Jitendra Awhad met Eknath Shinde : या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

Jitendra Awhad met Eknath Shinde at Varsha, Discussion in political circles | जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा

जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली आहे.  भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

या आधी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप अस्पष्ट आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा आले आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 
 

Web Title: Jitendra Awhad met Eknath Shinde at Varsha, Discussion in political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.