Jitendra Awhad Rupali Chakankar: "जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याबद्दल महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर गप्प का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:21 PM2022-11-14T18:21:36+5:302022-11-14T18:22:09+5:30

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेचा सवाल

Jitendra Awhad Molestation Case Why is Rupali Chakankar of Commission for Women silent on this incident asks victim BJP official | Jitendra Awhad Rupali Chakankar: "जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याबद्दल महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर गप्प का?"

Jitendra Awhad Rupali Chakankar: "जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याबद्दल महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर गप्प का?"

googlenewsNext

Jitendra Awhad Rupali Chakankar: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी गैरवर्तन केले. याबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या गप्प का आहे? त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे? असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

रिदा रशीद म्हणाल्या की, ठाण्यात रविवारी झालेल्या फ्लायओव्हरच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते. मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात असताना समोरून येणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मला सरळ-सरळ बाजूच्या पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले. ढकलून देत असताना, ‘तू इथे काय करते आहेस,’ असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला आहे. या घटनेची ध्वनिचित्रफित सर्वत्र प्रसारित झाली असून त्यात आव्हाड यांनी मला कोणत्या पद्धतीने ढकलले हे स्पष्टपणे दिसते आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या या कृत्याबाबत अजूनही चकार शब्द उच्चारलेला नाही. माझ्या तक्रारीबाबत पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही रशीद यांनी नमूद केले.

Web Title: Jitendra Awhad Molestation Case Why is Rupali Chakankar of Commission for Women silent on this incident asks victim BJP official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.