"राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगायला हवी", किरीट सोमय्या प्रकरणावर आव्हाड स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:22 PM2023-07-18T21:22:43+5:302023-07-18T21:23:22+5:30

"वैयक्तीकरीत्या हल्ला करुन जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला नाही."

Jitendra awhad on kirit somaiya "Politicians should be sensitive", Awhad spoke clearly on the Kirit Somaiya case | "राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगायला हवी", किरीट सोमय्या प्रकरणावर आव्हाड स्पष्टच बोलले

"राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगायला हवी", किरीट सोमय्या प्रकरणावर आव्हाड स्पष्टच बोलले

googlenewsNext

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एका व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेकजण सोमय्यांवर निशाणा साधत आहेत. तसेच, विविध शहरांमध्येही सोमय्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अधिवेशनातही सोमय्यांच्या व्हिडियोची चर्चा झाली. यातच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही."

"एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही," अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 
 

Web Title: Jitendra awhad on kirit somaiya "Politicians should be sensitive", Awhad spoke clearly on the Kirit Somaiya case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.