“वाल्मीक कराडला मोक्का का लावत नाही, ३०२चा आरोपी का करत नाही”; आव्हाडांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:55 IST2024-12-31T11:54:15+5:302024-12-31T11:55:29+5:30
Jitendra Awhad On Beed Sarpanch Case: तो स्वतःहून स्वाधीन होईल. त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

“वाल्मीक कराडला मोक्का का लावत नाही, ३०२चा आरोपी का करत नाही”; आव्हाडांचा सरकारला सवाल
Jitendra Awhad On Beed Sarpanch Case: बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडीसह अन्य विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा पूरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने वाल्मीक कराड अटकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तसेच सरकारवर निशाणा साधत आहेत. एक्सवर एक पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी सरकारला सवाल केला आहेत.
मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडवर एक-दोन नव्हे तर तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत.
वाल्मीक कराडला मोक्का का लावत नाही, ३०२चा आरोपी का करत नाही?
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती. अजूनही त्याला ३०२चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही, असे आव्हाड म्हणालेत.
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 31, 2024